आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 29, 2022

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : सहा महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने आरोपीला (बोरी-उमरगा जि. लातूर) येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

चैतन्य प्रभाकर सुरवसे (वय २४, रा. पेट्रोल पंपासमोर दांडेकर पुल, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मूळ गाव बोरी-उमरगा, जि. लातूर येथे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली. पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गु्न्हे शाखा युनिट-१चे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार रवींद्र फुलपगारे, मधुकर तुपसौंदर, दुर्योधन गुरव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();