आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सहा तासांत ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 13, 2022

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : म्हाडा (सोलापूर) येथे जाणार होता पळून

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खून करून म्हाडा (सोलापूर)ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला सहा तासांत बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बिबवेवाडीतील अप्पर ओटा येथील खासगी दवाखान्यासमोर ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली.

शिवदत्त ऊर्फ डी. सकट (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, विशाल ओव्हाळ (वय २६, पद्मावती वसाहत, पद्मावती, पुणे) याचा खून झाल्याची फिर्याद मयताचे काका गणेश विठ्ठल ओव्हाळ (वय ४६, रा. शंकरमहाराज वसाहत, बौद्ध विहारसमोर, धनकवडी, पुणे) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, खून केलेला आरोपी म्हाडा, सोलापूर येथे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये आणून तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षिका अनिता हिवरकर करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस हवालदार संतोष पाटील, पोलीस हवालदार श्याम लोहमकर, गणेश दुधाने, पोलीस नाईक दैवत शेडगे, पोलीस शिपाई शिवाजी येवले, रचिन फुंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();