आवृत्ती पुणे
← Back to Homepage

किरकोळ कारणावरून युवकास मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 20, 2021

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : टोळक्यातील सातपैकी तिघांना अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : किरकोळ कारणावरून सात जणांच्या टोळक्याने एका युवकास मारहाण केल्याची घटना बुधवारी अप्पर भागात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अप्पर भागात छोट्या छोट्या कारणासाठीदेखील मारामारीच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अप्पर येथील व्ही.आय.टी. कॉलेज रोडवर घडला. बुधवारी (ता. १८) या ठिकाणाहून लोकेश पगारे जात असताना, ‘तू भावेश गायकवाड याच्या सोबत का फिरतो,’ असे म्हणत सात जणांच्या टोळक्याने त्याला धारदार हत्याराने मारहाण केली आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आरोपी सौरभ शिंदे, आकाश गोरड, अक्षय अभंग, तेजस जगताप, चंदन राठोड, ओंकार भिसे आणि शिंदे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील काही आरोपी अल्पवयीन आहेत, तर काही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर याचा पुढील तपास करीत असून, त्यांनी यातील तीन आरोपींना पकडले असल्याचे सांगितले.

get_footer();