आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोंढव्यात पतीनं 21 वर्षीय पत्नीला 50 वर्षीय व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 26, 2021

लैला-मजनूने पतीला हाताने-दगडाने मारहाण करून केले जखमी

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय होता़, त्यामुळे त्याने तिचा पाठलाग केला. तेव्हा एका 50 वर्षाच्या व्यक्तीबरोबर 21 वर्षाची पत्नी जात असल्याचे त्याला आढळून आले. त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. त्याचा राग आल्याने लैला-मजनूने पतीला हाताने व दगडाने मारहाण करुन जखमी केले.

कोंढव्यातील एका सोसायटीसमोर मंगळवारी साडेचार वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या ३१ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यावरुन ५० वर्षीय व्यक्तीसह महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची पत्नी तिच्या परिचयाच्या 50 वर्षीय व्यक्तीला भेटायला गेली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा पाठलाग करुन त्या दोघांना कोंढव्यातील एका सोसायटीसमोर अडवले. पत्नी व 50 वर्षीय व्यक्तीला तुम्ही दोघे कुठे जाता, असे विचारले याचा राग येऊन पत्नीने फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. 50 वर्षीय व्यक्तीने दगडाने मारहाण करुन जखमी केले.

कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();