आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथून फॉर्च्युनर कारची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 5, 2022

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : महागड्या कार चोरण्याकडे चोरट्यांचा मोर्चा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोनसाखळी-दुचाकीबरोबर महागड्या चारचाकीवर चोरट्यांनी लक्ष केले आहे. कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथे पार्क केलेली कार चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

आनंद शशिकांत बंब (रा. ढोणे नहार पॅलेस, सुखसागरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथे ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा. फॉर्च्युनर कार पार्क केली. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२१ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास तेथे कार येऊन पाहिली, तर दिसून आली नाही, मित्र-नातेवाईकांकडेही शोध घेतला. मात्र आढळून आली नाही. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील पुढील तपास करीत आहेत.

get_footer();