आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयता-कुऱ्हाडीने वार करीत नुकसान करणारे चौघे अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 29, 2021

वडगाव बुद्रुक येथील घटना : किरकोळ भांडणाचा राग मनात धरून केली मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : किरकोळ भांडणातून घरात घुसून कोयता-कुऱ्हाडीने वार करून दुचाकी व घराचे नुकसान करणाऱ्या चौघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. रायगडनगर-जाधवनगर (वडगाव बु।) येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

देवेंद्र ऊर्फ बिट्या भाऊसाहेब पाडाळे (वय ३४, रा. विकासनगर, वडगाव बुद्रुक, पुणे), वैभव चंद्रकांत पवळे (वय १९, रा. रायगडनगर, गंगाई निवास, वडगाव बुद्रुक), ऋत्या ऊर्फ ऋतिक रमेश जागडे (वय १९, रा. वडगाव पठार, वडगाव बु।, पुणे), मल्हार ज्ञानेश्वर आवळे (वय १९, रा. विकासनगर, वडगाव बु।, पुणे) यांना अटक केली असून, इतर सात-आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी घरात जेवण करत असताना रोहन व त्याचे मित्र मंगेश जहागिरदार, शुभम उफाळे यांच्यामध्ये २६ डिसेंबर २०२१ रोजी सहाच्या सुमारास झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून सात-आठ जणांसह आरोपींने घरात घुसून फिर्यादी व त्यांच्या पत्नीस कोयता कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न करून दुचाकी व घराच्या खिडक्यांचे नुकसान करून दहशत पसरविली. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ पुढील तपास करीत आहेत.

रमेश पांगारे (वय ४५, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

get_footer();