आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयत्याने हल्ला करणाऱ्यासह दोन विधिसंघर्षित बालके ताब्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 23, 2021

खडकी पोलीस स्टेशनची कारवाई – खुन्नसने का पाहतो म्हणत घेराव घालून केली मारहाण

महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क

पुणे : खुन्नसने का पाहतो, आम्ही चांदणे गँगचे भाई आहोत, असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यासह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. कसाई मोहल्ला, खडकी येथे २१ ऑगस्ट रोजी ही घटना घडली.

याप्रकरणी साहिल ऊर्फ भिंगरी खान (वय १९ (रा. खडकी बाजार, खडकी, पुणे यांनी खडकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

प्रतिक राहुल लोंढे (वय १८, रा. कदम चाळ गाडीअड्डा, खडकी बाजार, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी हातात लोखंडी कोयता घेऊन फिर्यादीस खुन्नसने का पाहतो, आम्ही चांदणे गँगचे भाई आहोत. खडकीमध्ये आमची दहशत आहे, असे म्हणत घेराव घालून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादीला डोक्यात, पायावर, हातावर वार करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पळून जाताना परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण केली आहे. पुढील तपास खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी करीत आहेत.

get_footer();