आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी- हातात कोयते नाचवीत दहशत पसरविली

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : पूर्वीच्या भांडणाच्या वादातून लोखंडी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी दोघांना अटक केली असून, उर्वरित फरार आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत. आंबेगाव खुर्द येथील जांभुळवाडी रोडजवळील समृद्धी लेक शायर सोसायटीसमोर ही घटना रविवारी (दि. २२ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

याप्रकरणी आकाश पवार (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम हिरे आणि वस्ताद येनपुरे या दोघांना अटक केली असून, बंटी ऐनपुरे, रोहित पाटेकर, आदित्य ऊर्फ बबलू फटके, लक्की गायकवाड, शुभम हिरे, सार्थक मिसाळ, तुषार पवार, विजय दरोडे, वस्ताद येनपुरे आणि त्यांच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादीचे पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी लोखंडी कोयत्याने फिर्यादी व त्यांचा मित्र प्रथमेश यांना शिवीगाळ करीत कोयत्याने वार करून गंभीर जखमी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तेथील वाहनांवरही कोयत्याने मारून वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर हातात कोयते नाचवत परिसरात दहशत निर्माण केली आहे.

दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणिक, सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे, नितीन शिंदे, अंकुश कर्चे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, याप्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर करीत आहेत.

get_footer();