आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कुत्र्यावर ओरडली अन् शिव्यांचा भडीमार करीत केला विनयभंग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 16, 2021

वानवडी पोलिसांत फिर्याद : आझादनगरमध्ये तरुणाचा गैरसमज झाल्याने घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पाळीव कुत्र्याला जेवण देत असताना रस्त्यावरुन जाणार्‍यावर कुत्रे भुंकले. त्यामुळे ती खरं तर कुत्र्याला ओरडली. पण, घरासमोरून राहणार्‍या तरुणाला ती आपल्याला शिव्या देत आहे, असे वाटले. त्यामुळे त्याने तिच्यावर शिव्याचा भडीमार करुन अश्लिल कृत्य करुन विनयभंग केला. हा प्रकार आझादनगरमध्ये सोमवारी दुपारी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

याप्रकरणी आझादनगर (वानवडी) येथील एका २८ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वानवडी पोलिसांनी २८ वर्षाच्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या त्यांच्या घरासमोरील रोडवर पाळीव कुत्र्यांना जेवण देत होत्या. यावेळी रस्त्यावरुन जाणार्‍या एका व्यक्तीवर कुत्रा भुंकला. या कुत्र्याला फिर्यादी ओरडल्या. त्यांच्या घरासमोर राहणार्‍या तरुणाला त्या आपल्यालाच शिव्या देत असल्याचे वाटले. या तरुणाने कुत्रा भुंकल्यावर शिव्या द्यायला सुरुवात केली. घाणेरड्या व खालच्या पातळीवर शिवीगाळ करुन तो फिर्यादीच्या अंगावर धावून गेला.
त्यांचा हात पकडून अश्लिल कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. वानवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

get_footer();