आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘लागिरं झालं जी’ सिरियलमधील अभिनेत्याचं अपघाती निधन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 18, 2022

रोटी घाटात झाला अपघात : बारामतीमध्ये उत्कृष्ट कलाकार गमावल्याने हळहळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या सिरियलमधील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने यांचं दुर्देवी निधन झालं. 14 जानेवारी रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. डॉ ज्ञानेश माने हे रोटी घाटातून प्रवास करतेवेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

याबाबात माहिती अशी, डॉ ज्ञानेश माने हे रोटी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु, 14 जानेवारी रोजी सकाळीच त्यांनी दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बारामतीतील उत्कृष्ट कलाकार गमावल्याची हळहळ व्यक्त होत आहे.

अभिनेता डॉ. ज्ञानेश मानेंचा परिचय –

डॉ. ज्ञानेश माने (मुळ गाव झारगडवाडी, बारामती) पेशाने डॉक्टर होते. त्यांच्या मागे पत्नी, 2 भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे. लागिरं झालं जी या मालिकेत अभिनेते माने एका महत्त्वाच्या भूमिकेत होते. अनेक चित्रपट आणि मालिकेमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या.

get_footer();