आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लग्नाच्या आमिषाने 14 वर्षाच्या मुलीला केले गर्भवती

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 18, 2022

स्वारगेट पोलिसांत फिर्याद : उलट्या झाल्याने सोनोग्राफी केल्यानंतर उघडकीस आला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरी आलेल्या मामे भावाने लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर हा मामेभाऊ गुजरातला निघून गेला.

याप्रकरणी गुलटेकडी येथील इंदिरानगरमध्ये राहणार्‍या एका १४ वर्षाच्या मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या २० वर्षाच्या मामेभावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी ही घरी असताना तिच्या मामे भावाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. १५ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर हा मामेभाऊ गुजरातला निघून गेला. फिर्यादी यांना उलट्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांकडे तपासणी व सोनोग्राफी केली असता त्या तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

get_footer();