आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लग्नाच्या आमिषाने संबंध ठेवून मुलीला केले गर्भवती

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 4, 2022

कोंढव्यातील घटना : बोपदेव घाटातील लॉजवर नेऊन ठेवले वेळोवेळी शारीरिक संबंध

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवून त्यातून तिला ९ महिन्याचे गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होता.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सूरज पवार (वय २१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोंढवा येथील ३५ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पवार याने लग्नाचे आमिष दाखवून बोपदेव घाटाकडील लॉजवर नेऊन तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ती ९ महिन्यांची गर्भवती राहिल्यावर हा प्रकार समोर आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

get_footer();