आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोहगावमधील पवारवस्तीतील घर फोडून एक लाख ९० हजारांचा ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

फ्लॅट कुलूपबंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून एक लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना लोहगाव-वाघोलीमधील पवारवस्ती येथे घडली आहे.

मंगल सुभाष काळे (वय ५०, रा. माळवाडी, लेन नं.४, पवारवस्ती, वाघोली, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा फ्लॅट कुलूपबंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून एक लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास विमाननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.

get_footer();