आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोणी काळभोर पोलीस संघाने पटकाविले प्रथम पारितोषिक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 31, 2021

टेनिस क्रिकेट स्पर्धा : थेऊर येथील आयोजित स्पर्धेत ३२ संघांनी नोंदवला सहभाग

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये अटीतटीच्या सामन्यात लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले. सन्मानचिन्ह आणि ५५ हजार रुपये रोख बक्षीस असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

शहर पोलिसांच्या वतीने थेऊर (ता. हवेली) येथे फुल टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील संघाने सहभाग घेऊन चुरशीने लढत देत कुंजीरवाडीच्या संघाला नमवून प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व रोख ५५ हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या संघाला सन्मानचिन्ह व रोख ४४ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक प्रशांत गायकवाड, प्रशांत कळसकर, गणेश भापकर, पोलीस शिपाई अजिंक्य जोजारे, संदीप धुमाळ, प्रशांत सुतार, वसंत चव्हाण, समीर काकडे, वानवडी पोलीस स्टेशनचे अमर साळवे, मुंढवा पोलीस स्टेशनचे नाना सोडनवर, खडक पोलीसस्टेशनचे प्रदीप न्यायनीत यांचा पोलीस संघामध्ये समावेश होता.

get_footer();