आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोणीकंद पोलिसांनी दुचाकीचोराला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 14, 2021

पाच दुचाकी जप्त : लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एमआडीसी परिसरात चोरल्या दुचाक्या

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे ः लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एमआयडीसी परिसरातील दुचाकी चोरणाऱ्यास लोणीकंद पोलीसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

देविदास सुभाष दहिफळे
(वय ३०, रा.वाघोली ) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दुचाकी चोरटा वाघोलीतील भावडी रोडवरील येवले चहाजवळ हिरो होंडा घेता का अशी विचारणा करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या. लोणीकंद, चिखली, चंदननगर-२ आणि भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल करण्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीक़डून पाच मोटारसायकल सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, उपनिरीक्षक सुरज गोरे, समीर पिलाने, मोहन वाळके, बाळासाहेब सकाटे, कैलास साळुंके, अजित फरांदे, विनायक साळवे, बाळासाहेब तनपुरे, पांडुरंग माने, सागर शेडगे, अमोल ढोणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();