आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एम.जी. एन्टप्रायजेसच्या डिंपल सोमजीला सशर्त जामीन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 1, 2021

दिल्ली विमानतळावर अटक : ज्यादा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडविले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अल्केश सोमजी, डिंपल सोमजी (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दिल्ली विमानतळावरुन अटक केली होती. या प्रकरणात डिंपल सोमजी हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजुर केला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायालयाने डिंपल सोमजीला सशर्त जामीन मंजूर करताना महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 8 दिवसांत पासपोर्ट जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. याशिवाय न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अखिलेश सोमजी आणि त्याची पत्नी डिंपल सोमजी यांनी पुण्यातील नागरिकांना 24 टक्के वार्षिक परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य फरार झाले होते. आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती.

get_footer();