आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चिकन सेंटर चालकाला जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021

गुरुवार पेठेतील प्रकार : दोघांना अटक केली असून, दोन फरारींचा पोलीस तपास सुरू

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

गुरुवार पेठेतील चिकन सेंटरमध्ये गोंधळ घालत जीवे मारण्याची धमकी देऊन पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्यांना अटक केली असून, दोन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत. ही घटना दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी हम चिकन सेंटरमध्ये घडली.

झैद ऊर्फ लंगड्या जमीन दलाल (वय २०, रा. घोरपडी पेठ), उमेर आसीफ अन्सारी (वय २२, रा. गंज पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अब्दुल मुत्तलीब शेख (वय ३१, रा. सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्याचा भाऊ अल हम चिकन सेंटर दुकानात होते. त्यावेळी आरोपींनी दुकानात येऊन आरडाओरडा करीत शिवीगाळ करीत आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पाच हजार रुपयांची खंडणी मागितली.

या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी करीत आहेत.

get_footer();