आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पालिकेचा आरोग्य निरीक्षक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 12, 2021

ड्युटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी मागितली होती लाच : कचरा गोळा करणाऱ्याने केली होती तक्रार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि. ११) दुपारी रंगेहाथ पकडले आहे. कचरा गोळा करणार्‍या एकाने तक्रार दिल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. मनपाच्या आरोग्य निरीक्षकाने डयुटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी 5 हजाराची लाच घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

स्वप्नील कोठावळे असे लाच घेणार्‍या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

कचरा गोळा करणार्‍यांना ठराविक ठिकाणी डयुटी देण्यासाठी कोठावळेंनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार केली होती. प्राप्त तक्रारची शहानिशा करण्यात आली. पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सापळा रचला होता. त्यांनी आरोग्य निरीक्षक स्वप्नील कोठावळेंनी पंचासमक्ष 5 हजार रूपयांची लाच घेतली आहे. आरोग्य निरीक्षकाने लाच घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली एससीबीच्या पथकाने कारवाई केली.

get_footer();