आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलांच्या मांडीवर जाऊन बसणाऱ्या दोघांना अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 29, 2022

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगावमधील रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रस्त्याने जाणाऱ्या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, पाठलाग करुन प्रसंगी भररस्त्यात त्यांची छेड काढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मात्र, आता रोडरोमियोची मजल चहा पित बसलेल्या महिलांच्या मांडीवर जाऊन बसण्यापर्यंतचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार आंबेगाव येथील आईसाहेब चहा विक्री स्टॉलसमोर २६ जानेवारी रात्री साडेआठ वाजता घडला.

अमित इंद्र नाथ (वय ३०, रा. दत्तप्रसाद सोसायटी, आंबेगाव बु. ) आणि लक्ष्मण रामबहादुर साहु (वय २७, रा. चंद्रागण सोसायटी, आंबेगाव बु. ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी शिवणे येथील एका ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला व त्यांची मैत्रिण आईसाहेब चहा स्टॉल येथे चहा पित बसल्या होत्या. तेव्हा आरोपी शिट्टया वाजवत तेथे आले. फिर्यादी या बसल्या असताना जाणून बुजून ते फिर्यादीच्या मांडीवर येऊन बसले व त्यांच्या पोटाला हात लावून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीने त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन ढकलून देऊन मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

get_footer();