आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिंद्रा एक्सयूव्ही कार अपहार करणारे दोघे गोव्यातून जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : खोटा पत्ता सांगून फिर्यादीची केली होती फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महिंद्रा एक्सयूव्ही कारचे अपहार करून पळून गेलेल्या दोघांना गोव्यातून बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. आरोपींनी खोटा पत्ता सांगून कारचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले.

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये मच्छिंद्र विश्वनाथ दराडे (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड, पुणे) यांनी महिंद्रा एक्सयूव्ही कारचे अपहार केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून हमीद बावर ऊर्फ छेदीखान (वय ४०, रा. कोडलीम अंगडी, गोवा) आणि अविनाश कुमार प्रेमचंद यादव (वय ३२, रा. कोलवा गोवा) दोघांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील कारचा अपहार करणाऱ्यांचा मोबाईल ट्रॅकद्वारे तपास केला असता आरोपी गोव्यामध्ये असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी गोव्यामध्ये जाऊन आरोपींना कारसह ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींनी खोटा पत्ता सांगून कार भाडेतत्त्वावर नेल्याचे तपासात उघड झाले.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षिका (गुन्हे) अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, सागर घोरपडे, सचिन भिंगारदिवे, किरण तळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();