आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बनावट आधार कार्ड बनवणारा आणि मोबाईल चोराला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021

समर्थ पोलीस स्टेशनचा डबल धमाका कामगिरी- आरोपीला घेतले राहत्या घरातून ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने बनावट आधार कार्ड बनविणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद केले. तसेच दुसऱ्या एका कारवाईत मोबाईल चोरालाही अटक केली. गुरुवारी (दि.20 ऑगस्ट) समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखल गुन्हयातील आरोपीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व पांढऱ्या रंगाची ऍक्‍टीवा गाडीच्या आरटीओ नंबरच्या आधारे त्याचे रहाते घरातून ताब्यात घेतले.

विनायक राजू पूजारी (19, रा. स.नं. , डोबर वाडी, घोरपडीगांव ) असे त्याचे नाव आहे. त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दि.19 ऑगस्ट रोजी दारुवाला पुल चौक येथे गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे शर्टचे खिशातील मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मोबाईल व ऍक्‍टीवा गाडी गुन्हयाचे पुरावे कामी जप्त केला आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयात एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी रणजित बबन खेडेकर (35, रा. खेडेकर मळा, ऊरुळी कांचन पुणे) यास अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, बनावट आधार कार्ड अगदी सहजरीत्या बनवून देतो व सदरच्या गुन्हयामध्ये बनावट आधार कार्डचा वापर झालेला असून, ते बनावट आधार कार्ड रणजित खेडेकर यानेच बनवून दिले आहे. हा आरोपी मागील एक वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होता व पत्ता बदली करून रहात असल्याने मिळून येत नव्हता.

पोलीस उपायुक्त नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांचे मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक, संदीप जोरे, सहायक उपनिरीक्षक सतिश भालेराव, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुमित खुट्टे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, रिकी भिसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();