आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 21, 2021

पुण्यातील धक्कादायक प्रकार : पतीकडून 29 वर्षीय पत्नीचा अमानुष छळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आईच्या उपचारासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन येण्याची मागणी करुन मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे. तू आत्महत्या कर आणि माझ्या आयुष्यातून निघून जा असा धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार अंबरनाथ आणि चाऱ्होळी येथे ३ फेब्रुवारी ते २५ जून २०२१ दरम्यान घडला.

याप्रकरणी २९ वर्षांच्या महिलेच्या फिर्यादीनंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी प्रतिक कांबळे (वय ३१, रा. अलिबाग) याच्यासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा पती व सासूसासरे यांनी संगनमत करून सासुबाई यांच्या उपचारासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये अशी फिर्यादीकडे वारंवार मागणी केली. प्रतिक कांबळे याने फिर्यादी यांना मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे. तू आत्महत्या कर व माझ्या आयुष्यातून निघून जा, असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण केली.

फिर्यादी यांचा मानसिक व शारीरीक छळ केल्याने त्या माहेरी निघून आल्या. त्यानंतर आता त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.

get_footer();