आवृत्ती पुणे
← Back to Homepage

छ. संभाजीनगर मध्ये व्यापाऱ्यांच्या ‘मन की बात, भाजपा के साथ’

maharashtra jain warta • News Slider, Political, Previous Issue, Social • July 6, 2023

सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

छ. संभाजीनगर : भाजपा व्यापारी आघाडी च्या वतीने येत्या रविवारी ९ जुलैला व्यापाऱ्यांच्या ‘मन की बात भाजपा के साथ’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजता आयएमए हॉल मध्ये या मेळाव्याचे आयोजन होणार आहे.

या पुढाकारामध्ये लहान मोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होत लोकनियुक्त प्रतिनिधींकडे आपल्या मनातल्या गोष्टी, अडचणी, गरजा मांडाव्यात अशी अपेक्षा आहे. त्यासाठी लहान मोठ्या सर्व व्यापारी बंधुंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष हितेशभाई कांकरिया यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या ९व्या वर्षपुर्ती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्यापारी संघटनेची प्रणाली, भविष्यातले संकल्प, समस्या, सुविधा आदी सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींसमोर मांडायच्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होत, चर्चेत प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

get_footer();