आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मारहाण करणार्‍या तिघांना अटक

maharashtra jain warta • News Slider, Police • July 17, 2021

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : लोखंडी सिखंजा, बांबू आणि रॉडने मारहाण

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

मारहाण करून पलायन केलेल्या तिघा आरोपींना अटक करण्यास भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असून, सदर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

सदर आरोपींनी लोखंडी सिखंजा, बांबू आणि रॉडने दोघांना मारहाण केली होती. नारायण ठाकरिया चव्हाण (वय 55), व्यकटेश नारायण चव्हाण (वय 31) आणि गणेश नारायण चव्हाण (वय 23) (तिघेही रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव, पुणे ) अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर संजय शर्मा व बबुल शर्मा यांना मारहाण केल्याचा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
सदर मारहाणीची घटना कात्रज येथील नर्मदा सिटी बांधकाम साईटवरील मजल्यावर घडली. आरोपींनी वायर तोडल्याण्या कारणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी सिखंजा, बांबू आणि रॉडने अर्जदारांच्या डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी करून मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथून पलायन केले. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून त्या तिघांना ताब्यात घेतल्यावर आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त, सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, भारती विदयापीठ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, तपास पथकाचे अंमलदार रविन्द्र भोसले, अण्णासाहेब माडीवाले, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांनी केलेली आहे.

get_footer();