आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मसाज पार्लरमधील वेश्याव्यवसायावर छापा टाकून आठ पीडित मुलींची सुटका

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कामगिरी : बालेवाडी फाटा येथील कणक स्पावर कारवाई

पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा येथे प्राप्त झालेल्या माहितीचे आधारे कणक स्पा, वरसे, बालेवाडी फाटा, बाणेर पुणे येथे बुधवारी (८ सप्टेंबर) बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, सदर ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे कारवाई करून मसाज सेंटरची मालकीण (वय ४५, रा. काळेवाडी फाटा, पुणे) व मॅनेजर निकित मोतीलाल अगरवाल ( वय२४, रा. प्राधिकरण, पुणे) यांना ताब्यात घेऊन, सदर ठिकाणावरून एकूण आठ पीडित मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

घटनास्थळावरून एकूण ९,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नमुद आरोपींविरुद्ध चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हनमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, प्रफुल्ल गायकवाड, महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, नीलम शिंदे, मनीषा पुकाळे, अश्विनी केकाण यांनी केली आहे.

get_footer();