आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मेट्रोमोनियल साईटवरील ओळखीतून बलात्कार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 26, 2022
07 05 2022 Sharad Pawar photo future new
Spread the love

हिंजवडी पोलिसांत फिर्याद : वाढदिवसाच्या पार्टीला घरी बोलावून केले गैरवर्तन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला घरी बोलावले. रात्री तिला तिच्या घरी जाण्यापासून रोखत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच पाच दिवसानंतर तिच्याशी पुन्हा गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार 21 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर रोजी हिंजवडी (भूमकर चौक) येथे घडला.

निशांत हरीश चंदनानी (वय 34, रा. अयोध्यावस्ती, रतलाम, मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने 24 जानेवारी रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी अभियंता असून ती घटस्फोटित आहे. त्याच प्रमाणे आरोपी देखील अभियंता असून तो देखील घटस्फोटित आहे. दुसरे लग्न करण्यासाठी पीडित तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्या वेबसाईटवरून आरोपीने पीडित तरुणी सोबत ओळख केली. ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे’, असे सांगून आरोपीने पीडित फिर्यादी तरुणीशी मैत्री केली. 21 नोव्हेंबर रोजी आरोपीने त्याच्या वाढदिवसानिमित्त भुमकर चौक, हिंजवडी येथील त्याच्या राहत्या घरी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पीडित तरुणीला बोलावले. रात्री उशिरा पार्टी संपली. तू एकटी तुझ्या घरी जाऊ नको, रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा, असे म्हणून आरोपीने फिर्यादी तरुणीला त्याच्या भुमकर चौक येथील घरी थांबवून घेतले. त्यानंतर फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणीसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

26 01 2022 4
get_footer();