आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मध्यस्थी केल्याने सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 6, 2021

खडक पोलिसांची कारवाई : तिघे अटकेत, एकावर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून चौघा सराईतांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एकावर गुन्हा दाखल केला आहे.

अविनाश ऊर्फ पप्पु चंद्रकांत चौधरी (वय ३६), विशाल ऊर्फ पिंटु चौधरी (वय ३८), आकाश यादव (वय २५, तिघेही रा. गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेखर चिकने (रा. गाडीखाना, शुक्रवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अविनाश चौधरी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी गौरव रोहिदास काची (वय ३७, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, काची आणि आरोपी मित्र असून, एकाच ठिकाणी राहतात. फिर्यादी यांचा मित्र दुर्गेश व आरोपी यांच्यामध्ये भांडणे झाली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी फिर्यादी गेले होते. त्याच्या रागातून अविनाश चौधरी याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. विशाल चौधरी याने लाकडी बांबूने पाठीत मारले. आकाश यादव याने लाकडी स्टंपने पायावर मारले. अविनाश चौधरी याने कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.

पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
get_footer();