आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 3, 2021

लष्कर पोलिसस्टेशन : तांत्रिक सूत्रांच्या माहितीनुसार केला तपास

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या विवाहित पुरुषाला लष्कर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे बावधन येथून जेरबंद केले. न्यू मोदिखाना येथे २० ऑगस्ट रोजी ही घटना घडल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी लष्कर पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे हलवून आरोपीला ताब्यात घेतले.

प्रणय अरविंद कदम (वय ३२, रा. न्यू मोदिखाना, कॅम्प, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांनी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची मुलगी मोहरम सणाचे पंजे पाहण्याकरिता असे सांगून घराबाहेर गेली, ती पुन्हा आली नाही. दरम्यान, फिर्यादीने नातेवाईकांकडे तपास घेतला. मात्र, तिचा शोध लागला नाही. त्यामुळे लष्कर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवून, तांत्रिक आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीआधारे आरोपीला बावधण येथून ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे लग्न झाले असून, त्याला दोन मुले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षिका शीतल जाधव व सहायक पोलीस निरीक्षक मनमित राऊत यांनी दोन पथकाच्या माध्यमातून आरोपी व पीडितेच्या मोबाईल लोकेशनवरून तपास सुरू केला. मात्र, आरोपीने मोबाईल बंद करून ठेवला. मात्र, महिला पोलीस हवालदार मंगल लाकडे, पोलीस नाईक गणेश कोळी, पोलीस शिपाई अतुल मेंगे, सचिन मांजरे, नानासाहेब घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();