आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा सीसीटीव्हीमध्ये कैद!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 23, 2021

पुणे पोलिसांची कारवाई : मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भल्या सकाळी वेळी दुध अथवा काही कामासाठी लोक दरवाजा लोटून घराबाहेर गेल्याचे पाहून तो आत शिरायचा आणि कोणाला काही समजायच्या आत घरात चर्जिंगला लावलेले अथवा ठेवलेले मोबाईल घेऊन लंपास व्हायचा. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने शहराच्या विविध भागातून तब्बल २२ मोबाईल हँडसेट चोरले होते. मात्र, एके ठिकाणी तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि त्याचा हा कारनामा उघडकीस आला. पुणे पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेऊन जेरबंद केले.

मुरली नागराज (वय ३५, रा. नागोरी, जि़ शिमोगा, कर्नाटक) असे या चोरट्याचे नाव आहे. शुक्रवार पेठेतील भरत राज पुरोहित यांच्या घरातून व त्यांच्या सहकार्‍यांच्या घरातून मोबाईल चोरीला गेले होते. या ठिकाणी तपास करीत असताना विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यात मोबाईल चोरी करणारा चोरटा कैद झाला होता. त्यावरुन आरोपीचा शोध सुरु केला. खास बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की, हा मोबाईल चोरटा कात्रज येथील संतोषनगर परिसरात थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने संतोषनगर परिसरात त्याचा शोध सुरु केला. तेव्हा तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्यांच्याकडून तब्बल २२ मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. हे मोबाईल त्याने विश्रामबाग, भारती विद्यापीठ, वारजे पोलीस ठाण्याच्या परिसरातील गेल्या काही दिवसांमध्ये चोरले होते.

नागराज हा मुळचा कर्नाटकातील शिमोगा येथील राहणारा असून, काही दिवसांपूर्वीच तो गावावरुन पुण्यात आला होता. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तो चोर्‍या करीत असे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, कर्मचारी संजय दगडे, शरद वाकसे, हेमंत पालांडे, सताप्पा पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();