आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोबाईल शॉपीचालकाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 9, 2022

बार्शी पोलिसांत फिर्याद : बार्शीतील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शीत व्यवसाय करायचा असेल, तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल शॉपीच्या दुकानदाराला शिवीगाळ करून मारहाण केली, त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जितेंद्र ललवाणी (रा. आझाद चौक, जितेंद्र मोबाईल वर्ल्ड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार हर्षल रमाकांत होनराव ऊर्फ बिट्ट्या (रा. आढळराव रोड, सुभाषनगर, बार्शी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, बार्शीमध्ये व्यवसाय करायचा असेल तर मला मोबाईल, चार्जर, मोबाईलच्या अॅक्सेसरीज फुकट द्यावे लागतील, अशी धमकी हर्षल ऊर्फ बिट्ट्याने जितेंद्र ललवाणी आणि त्यांच्या बंधू हितेश ललवाणी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी ललवाणी यांचे वडिल गेले, तर त्यांनाही आरोपीने कानशिलात लगावली. या प्रकारामुळे बार्शीतील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पुढील तपास बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाल करीत आहेत.

get_footer();