आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोबाईल चोरी करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021

विश्रामबाग पोलिसांची कारवाई : पाच वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेशोत्सवामध्ये पोलिसांची गस्त सुरू असताना संशयावरून एका मोबाईल चोराला अटक केली. त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे ५ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त केले.

गयाकुमार रसिकलाल चौधरी (रा. बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, विश्रामबाग पोलीस स्टेशनमधील पोलीस गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस शिपाई प्रशांत पालांडे व सत्ताप्पा पाटील यांना संशयित व्यक्ती आढळली. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती केली असता, त्याच्याकडे पाच वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल आढळून आले. त्यातील विवो कंपनीचा मोबाईल मंडई येथून चोरी केल्याची त्याने कबुली दिली.

विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुंडे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस अंमलदार संजय दगडे, सागर गोंजारी, प्रशांत पालंडे, प्रशांत शिंदे, सत्ताप्पा पाटील, ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();