आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोठा नफा मिळेल असे सांगून पाच लाख ऐंशी हजार रुपयांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 2, 2022

कोंढवा पोलिसांत महिलेने दिली फिर्याद : ७ जून ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंड्री (ता. हवेली) येथे ७ जून ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान ही घटना घडली.

याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेला व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून आरोपीने पाच लाख ऐंशी हजार रुपये घेतले. मात्र, त्या बदल्यात कोणताही परतावा न देता फसवणूक केली आहे. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. पाटील पुढील तपास करीत आहेत.

get_footer();