आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोठ्या अंमली पदार्थाच्या साठ्यासह दाम्पत्य ताब्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 30, 2021

कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल : संशयावरून पोलिसांनी केली कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक एकने पती-पत्नीला ताब्यात घेऊन १३ लाख ४० हजारांचे चरस व एम.डी. हे अंमली पदार्थ हस्तगत केले. त्यांच्याकडून कार व ईतर ऐवजासह एकूण १९ लाख ५ हजार ४२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

मोहम्मद अफजल अब्दुलसत्तार नागोरी (वय ४० रा, मुंबई) आणि शबाना मोहम्मदअफजल नागोरी (वय ३८, धंदा घरकाम) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी (दि. २७ नोव्हेंबर) पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे कोथरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा त्यांना चांदणी चौकाकडे जाणारे सार्वजनिक रस्त्यावर अंमली पदार्थ रेकॉर्डवरील मोहम्मद अफजल अब्दुलसत्तार नागोरी हा एका होन्डा सिटी कारमध्ये एक महिला व लहान मुलीसह संशयितरित्या थांबला असताना दिसला. त्यांना संशयावरुन ताब्यात घेतले असता ते दोघेही पती-पत्नी असल्याचे निदर्शनास आले. त्यांची झडती घेतली असता मोहम्मदअफजल नागोरी हा त्याचे ताब्यात ८ लाख ४० हजार रुपयांचे ५५ ग्रॅम ९७० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर दोन मोबाईल फोन, होन्डा सिटी कार असा ऐवज व शबाना मोहम्मदअफजल नागोरी (38, धंदा घरकाम ) हिचे ताब्यात 5 लाख रुपयांचा 506 ग्रॅम 10 मिलीग्रॅम चरस हा अंमली पदार्थ , एक ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, रोख रुपये 3420 व काळया रंगाची लेदर पर्स असा एकुण सर्व मिळुन 19 लाख 5 पाच 420 चा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या जवळ बाळगताना मिळून आला. त्यामुळे त्याचे विरुध्द कोथरुड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्‍टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची ३० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.


पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार संदिप जाधव, मनोज सालुंके, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();