आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोटारसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 13, 2022

कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा : धर्मादाय आयुक्त कार्यालयसमोर झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मोटारसायकलच्या धडकेत झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावर ५ जानेवारी २०२२ दुपारी १.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.

नंदकुमार गणपत ढावरे (वय ३८, रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता ढावरे (वय ५०, रा. सहकारनगर, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावरून पायी जात होते. त्यावेळी भरधाव वेगातील मोटारसायकलची त्यांना जबर धडक बसून अपघात झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षिका प्रेरणा कुलकर्णी पुढील तपास करीत आहेत.

get_footer();