आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मुलाला सांभाळत लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 15, 2021

हडपसर परिसरातील घटना : २०१८ ते १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तुझ्याबरोबर लग्न करतो. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे आश्वासन देऊन महिलेवर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करुन फसवणूक करणार्‍यावर हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2018 पासून 10 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला आहे.

विरभद्र सुधाकर खरोसे (वय 37, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगी येथील एका 29 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मुलासमवेत फुरसुंगी येथे राहतात. विरभद्र खरोसे याने फिर्यादी यांना लग्नाचे आश्वास दिले. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे सांगून विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. तेव्हा त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.

get_footer();