आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या पैसे व दागिने चोरणारे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 16, 2021

खडक पोलिसांची कामगिरी : मुलीच्या आई-वडिलांनी मानले पोलिसांचे आभार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने घरातील एका डब्यात ठेऊन देवदर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. हा प्रकार पुण्यातील गंज पेठ येथे घडला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडक पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या पाच तासात आरोपीला गजाआड करुन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मुलीच्या घरच्यांनी पोलिसांचे आभार मानले.

आकाश संजय भोरे (वय-23 रा. नवीन म्हाडा कॉलनी, रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी व्यंकटेश शिमाप्पा पल्ला (वय-40 रा. महात्मा फुलेवाडा शेजारी, गंज पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर मारामारी आणि विना परवाना शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न अवघेकाही दिवसांवर येऊन ठेपले आहे. घरात लगीन घाई सुरु असताना रविवारी (दि.12) घरातील सर्वजण नवरी मुलीला घेऊन देवदर्शनासाठी तुळजापूर येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लग्नासाठी जमवलेली रोख रक्कम आणि दागिन घेऊन आरोपीने पोबारा केला. सोमवारी सकाळी शेजाऱ्यांनी पल्ला यांना फोन करुन घर उघडे असल्याची आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिली. त्यावेळी पल्ला यांनी स्वयंपाक घरातील कडीच्या डब्यात पैसे आणि दागिने आहेत का हे तपासण्यास शेजाऱ्यांना सांगितले. त्यावेळी डब्याची कडी तुटलेली असून त्यामध्ये पैसे नसल्याचे पल्ला यांना सांगण्यात आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. पल्ला यांनी पुण्यात येऊन खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास पथकाने आरोपीचा शोध सुरु केला.

दरम्यान, पोलीस अंमलदार संदिप तळेकर व रवी लोखंडे यांना आरोपी शंकरशेठ रोडवर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 6 तोळ्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, शंकर कुंभारे, पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप पाटील, संदिप तळेकर, रवी लोखंडे, विशाल जाधव, राहुल मोरे, कल्याण बोराडे, हिंमत होळकर, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, सागर घाडगे, किरण शितोळे, महेंद्र पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();