आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महापालिका कचऱ्याच्या डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 5, 2022

डंपरचालक अटकेत : महंमदवाडी-उंड्री रस्त्यावर झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कचऱ्याच्या डंपरची वाहनास धडक बसून एकाचा मृत्यू झाला. डंपरचालकाला अटक केली असून, डंपर जप्त केला आहे. महंमदवाडी-उंड्री रस्त्यावर ३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

रामभाऊ महादेव जाधव (वय ५०, रा. कोंढवा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा गायकवाड (वय ४२, रा. मुंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार डंपरचालक नुरूअप्पा वडगिरी (वय ३३, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे) याला ताब्यात घेतले असून, डंपर पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महापालिकेच्या डंबरमधून कचरा घेऊन जात होते, त्यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या जोडीदाराच्या वाहनाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात एकजण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस फौजदार प्रताप डोईफोडे करीत आहेत.

get_footer();