आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नदीपात्रात सापडलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 30, 2021

येरवडा परिसरातील घटना : अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

येरवड्यातील नदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस हवालदार शाम बांदल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात पालकांविरुद्ध फिर्याद दिली आहे.


येरवड्यातील भैरोबा पंपिग स्टेशनजवळ असलेल्या नदीपात्रात नवजात अर्भक सापडल्याची माहिती नागरिकांनी येरवडा पोलिसांना दिली. पोलिसांनी नवजात अर्भकाला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


नवजात अर्भकाचे पालकत्व न स्वीकारता त्याला बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्या अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर तपास करत आहेत.

get_footer();