आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमध्ये आढळली सव्वाकोटींची माया

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 11, 2021

दुहेरी मोक्काची कारवाई : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत पोलीस स्टेशनमध्ये पिता-पुत्रावर गुन्हे

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अवैध व्याजाच्या व्यवसायातून भूखंड व आलिशान वाहने बळकावण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नानासाहेब गायकवाड याच्या दोन लॉकर्समध्ये तब्बल सव्वा कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीच्या विटा, हिऱ्यांचे दागिने, तब्बल पन्नास लाख रुपयांची आणि बळजबरीने लिहून घेतलेली जमीनीची कागदपत्रेही आढळली आहेत. ही सर्व माया केवळ दोनच लॉकर्समध्ये आढळली असून, अन्य अनेक लॉकर्सची तपासणी जारी आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात नानासाहेब गायकवाड व गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड या पिता-पुत्रांवर कौटुंबिक हिंसाचारासह खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापती साठी पळवून नेणे, दुखापत करणे, बेकादेशीरपणे जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्निशस्त्र बाळगणे, अवैधरित्या सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध दुहेरी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

गायकवाड याच्याबरोबरच त्याचे कुटुंबीय व निकटचे सोनाली दीपक गवारे, (वय ४०) दिपक निवृत्ती गवारे (वय ४५, दोघेही रा. शिवाजीनगर, पुणे), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा. सर्वोदय रेसिडेन्सी, ए विंग, फ्लॅट नं.२,विशालनगर, पिंपळे निलख, पुणे), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती औंध पुणे) यांच्यावर देखील गुन्हा केला आहे. यापैकी वाळके बंधू अद्याप फरारी आहेत.




get_footer();