आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाशी तालुकाध्यक्षपदी ताराचंद डुंगरवाल यांची नियुक्ती

maharashtra jain warta • News Slider, Police, Political, Previous Issue • November 15, 2021

शरद पवार यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविणार- ताराचंद डुंगरवाल यांची माहिती

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाशी तालुकाध्यक्षपदी ताराचंद पन्नालाल डुंगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डुंगरवाल यांनी पक्षबांधणीच्या कार्यासाठी आणि सामाजिक कार्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत आपल्या माध्यमातून जाणार आहेत.

तसेच, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यासाठी केलेले काम आणि त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदान तसेच राहुल भैय्या मोटे यांनी भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातील विकासाचे महत्त्वपूर्ण योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचविणार आहोत, असा विश्वासही नियुक्ती पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

तालुकाध्यक्षपदी निवड केल्यानंतर डुंगरवाल म्हणाले की, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विचार समाजातील तळागळापर्यंत पोहोचविणार आहे. सामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आतापर्यंत काम केले असून, त्याची पक्षाने दखल घेत माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी यशस्वी करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

get_footer();