आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नियोजीत पत्नीला मारण्याचा प्रयत्न करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 16, 2021

कोंढवा येथील धक्कादायक घटना : जेवणास फार्म हाऊसवर नेऊन केले कृत्य

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नियोजित पत्नीने दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये, तसेच त्याच्याशी लग्न करु नये, म्हणून तरुणीला जेवायला नेण्याच्या बहाण्याने बंद फार्म हाऊसवर नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

आरिफ इसाक शेख (वय २९, रा. मेयफेअर एलिगेट, ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका २७ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी आरिफ शेख यांचे लग्न जमले आहे.

या दरम्यान, शेख याने आपल्या भावी पत्नीकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून ११ लाख रुपये घेतले आहेत. १६ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी यांना शेख याने जेवण्याच्या बहाण्याने सासवड रोडच्याकडेला असलेल्या एका बंद फार्म हाऊसवर नेले. तेथे फिर्यादी यांनी दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये, तसेच त्याच्याशी लग्न करु नये, असे त्याने सांगितले. त्याला फिर्यादीने नकार दिल्यावर त्याने जड वस्तूने या तरुणीच्या डोक्यामध्ये वार केला. तसेच चॉपरसारख्या हत्याराने गळ्यावर, मानेवर, हातावर, दंडावर, मांडीवर वार करुन गंभीर जखमी केले.

फिर्यादी यांनी उपचार घेतल्यानंतर आता तक्रार केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आरिफ शेख याला अटक केली आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

get_footer();