आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कुख्यात गुंड मारणे टोळीतील अट्टल गुन्हेगार रूपेश मारणे स्थानबध्द !

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 13, 2021

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 50 जणांवर कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगार रुपेश कृष्णराव मारणे (वय -38 रा. नवएकता कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 50 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

कुख्यात गुंड गजानन मारणे तळोजा करागृहातून बाहेर पडल्यानंतर त्याची मुंबई-पुणे महामार्गावर रॅली काढण्यात आली होती. याप्रकरणात रुपेश मारणेसह इतरांना कोथरुड पोलिसांनी अटक केली होती. तसेच रुपेश मारणे याने जमाव बंदीचे उल्लंघन करुन मध्यरात्री भररस्त्यात वाढदिवसाचा केक कापून नागरिकाला धमकावले होते. याप्रकरणी त्याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश मारणे याच्यावर कोथरुड, वारजे माळवाडी, स्वारगेट, येरवडा, पौड, तळेगाव दाभाडे, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथिदारांसह तलवार, कोयता, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांह फिरताना खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत, दंगा, सरकारी कामात अडथळा, साथीचारोग प्रतिबंधक उपाय योजनांचे उल्लंघन, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मागील 18 वर्षात 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

रुपेश मारणे याच्या दहशतीमुळे नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते. मारणे याच्यावर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
प्रस्तावाची पडताळणी करुन रुपेश मारणे याच्यावर एमपीडीए ॲक्ट अंतर्गत एक वर्षासाठी औरंगाबाद येथे स्थानबद्धतेचे आदेश दिले आहेत.
कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात तब्बल 50 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

get_footer();