आवृत्ती पुणे
← Back to Homepage

न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 27, 2021

मार्केटयार्ड पोलिसांत एकावर गुन्हा : फोटो डिलिट करण्यासाठी मागितली 1.70 लाख रुपयांची खंडणी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : इंस्ट्राग्रामवर मैत्री करुन त्यातून प्रेमसंबंध निर्माण करुन एका अल्पवयीन मुलीला फसवून तिचे न्यूड फोटो पाठविण्यास सांगितले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर फोटो डिलिट करायचे असेल तर 1 लाख 70 हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी सुयश दत्तात्रय पानसरे (वय २१, रा. गंगाधाम सोसायटी, मार्केटयार्ड) याच्याविरुद्ध ३७६, ३८५, ३२३, ५०४, ५०६/२ सह पोक्सो अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने फिर्यादी अल्पवयीन असताना तिच्यासोबत २०१६ मध्ये मैत्री केली. नंतर प्रेमसंबंध निर्माण करुन इंस्ट्राग्रामवर न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले. प्रेमात बुडालेल्या या अल्पवयीन मुलीने त्याला आपले न्यूड फोटो पाठविले.

त्यानंतर २०१९ मध्ये फिर्यादीचे आईवडिल घरी नसताना सुयश घरी आला. त्याने हे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आता त्याने तुझे फोटो डिलिट करायचे असेल तर १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फोटो व्हायरल करुन तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे या तरुणीने घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक ढमढेरे तपास करीत आहेत.

get_footer();