आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नायलॉन मांज्याचे व्यापारी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 14, 2022

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : फरासखाना पोलिसांत फिर्याद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नायलॉन मांजाच्या वापर, विक्री आणि साठा करण्यास बंदी असताना पुणे शहरात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. नायलॉन मांजा पक्षांसाठी आणि लोकांसाठी प्राणघातक ठरत असल्याने पुणे शहरात त्याच्या विक्रीवर बंदी असताना त्याची विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ रिळ मांजा व ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

जुनेद अकबर कोल्हापुरवाला (वय-29 रा. 246, गणेश पेठ, पुणे), अदनान असिफअली सय्यद (वय-19 रा. गणेश पेठ) यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम 336,188 व पर्यावरण कायदा 5,15 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिवांनी प्लास्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाने पक्षी व माणसांना होणाऱ्या दुखापतीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मांजा तयार करणाऱ्यांवर आणि वापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक मांजाची विक्री कोठे होत आहे का याचा शोध घेत होते. त्यावेळी बोहरी आळीत एक दुकानदार चोरुन मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दुकानात बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर दुकानावर छापा टाकून दुकानातील नॉयलॉन मांजाचे 19 रिळ व रोख रक्कम असा एकूण 49 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दुकानाच्या मालकांना बेड्या ठोकल्या.

प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाच्या वापरामुळे पक्षी आणि माणसांना गंभीर दुखापत होत असतात. त्यामुळे अशा प्रकारे मांजाची विक्री करु नये तसेच जवळ बाळगू नये असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असाही इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण, रुखसाना नदाफ यांनी केली.

get_footer();