आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगार चालविणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021
June 2017 Issu59
Spread the love

हिंजवडी पोलिसांत गुन्हा : सात जणांवर गुन्हा, छापा टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की

महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क

पुणे : भाड्याने फ्लॅट घेऊन त्यात ऑनलाईन जुगार अड्डा सुरु केला होता. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.

नारदमूनी नंदजी राम (वय ३०), जयकुमार कुंदन मेहता (वय १८), सतिश कृष्णा कन्सारी (वय २९), चिंटुकुमार रामस्वरुप गुप्ता (वय २९), विक्रम महादेव काळे (वय २२, रा. माळशिरस), दीपक अशोककुमार सहा (वय २६), हरिशकुमार जी बैरागी (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा जुगार अड्डा चंद्रकुमार राकेश रुपवाणी (रा. रायपूर, छत्तीसगड) याच्या सांगण्यावरुन सुरु करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव येलमार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (७७३/२१) फिर्याद दिली आहे.

आरोपींनी हिंजवडी येथील फेज २ मधील हायमाऊट सोसायटीत फ्लॅट भाड्याने घेऊन सोसायटीच्या रहिवाशांना काहीही कल्पना न देता बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन चंद्रकुमार रुपवाणी याच्या सांगण्यावरुन ऑनलाईन बेटिंगचे काम सुरु केले होते. या ऑनलाईन जुगार अड्ड्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता छापा टाकला. तेव्हा तेथे असलेल्यांनी त्यांना ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी या फ्लॅटमधून १८ मोबाईल, २ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर असा ४ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक काटे तपास करीत आहेत.

18 10 2021 News 4
get_footer();