आवृत्ती पुणे
← Back to Homepage

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

maharashtra jain warta • News Slider, Police • July 15, 2021

स्वारगेट पोलीसाची कामगिरी

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

दिनांक ०८/०१/२०२१ रोजी मुरुम पोलीस स्टेशन मधील आरोपी गुन्हयाच्या तपासासाठी मुरुम पोलीस स्टेशनचे अमलदार यांनी येरवडा कारागृह येथुन ताब्यात घेवुन मुरुम उस्मानाबाद येथे घेऊन जाण्यासाठी स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड येथे आणले असता सदर आरोपीने पोलिसांना हिसका देवुन बेडी व दोरीसह पळून गेला होता .त्या आरोपीस स्वारगेट पोलिसांनी २४ तासाच्या आता जेलबंद केले.

  दिनांक ०९/०१/२०२१ रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हयाचा तपास करीत असताना स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पुणे सोमनाय जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत  प्राप्त झालेल्या  माहिती नुसार सदर गुन्हयातील आरोपी रोहन ऊर्फ बंटी बिरू सोनटक्के वय-२१ वर्षे,रा-यशदीप चौक वारजे माळवाडी पुणे यास शिताफिने ताब्यात घेण्यात आले आहे.

                 सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त  पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे संजय शिंदे, पोलीस  उप-आयुक्त परिमंडळ-०२.पुणे  सागर पाटील, स्वारगेट  विभाग पुणे सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे).पुणे बाळासाहेब कोपनर व सोमनाथ जाधव  यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस  निरीक्षक ए.के रसाळ, सहाय्यक उपनिरीक्षक जायभाय,पोलीस उपनिरीक्षक  आदलिंग, पोलीस उपनिरीक्षक  जाधव, पोलीस उपनिरीक्षक त्रंबके, पोलीस कुंभार, पोलीस खोमणे,पोलीस  सोमनाथ कांबळे,सदिप साळवे पोलीस दळवी,पोलीस भोकरे, पोलीस लखन ढावरे, स्वाती जगताप यांच्या  पथकाने केलेली आहे.

get_footer();