आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • January 7, 2022

हडपसर पोलिसांत फिर्याद : भेकराईनगर साई संकुल बिल्डिंगमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लिफ्टच्या डक्टमधील टेरेसवरून पडून गंभीर जखमी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. भेकराईनगर-हडपसर येथे ४ जानेवारी २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

किशोर लक्ष्मण कांबळे (वय ४१, रा. साई संकुल बिल्डिंग, भेकराईनगर, हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी कोमल कांबळे (वय ३५, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, बिल्डरने अर्धवट बिल्डिंगचे काम अवस्थेत असताना फिर्यादीला राहण्यासाठी फ्लॅट दिला. लिफ्ट न बसविता हलगर्जीपणा केल्यामुळे लिफ्टसाठी असणाऱ्या डक्टमधील टेरेसवरून फिर्यादीचे पती पडून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();