आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने विनयभंग करणारे दोघे अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 14, 2022

खडक पोलिसांत फिर्याद : ‘करणी’ दूर करण्यासाठी ३५ वर्षीय महिलेकडून घेतले 50 लाख

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नातेवाईकांनी करणी केली आहे, त्यासाठी होमहवन, बोकडाचा बळी देण्याबरोबरच अघोरी कृत्य करुन एका महिलेची तब्बल 50 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली.


बाबाकडून पैसे मिळवून देतो, असे सांगून दुसर्‍याने या महिलेशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवार पेठ व गंजपेठेत 2018 ते 2019 दरम्यान घडला.

राजेंद्र बलराम कन्ना (वय ४५, रा. गंज पेठ) आणि मनिष बापूराव शिंदे (वय ४२, रा. देहुरोड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सोमवार पेठेत राहणार्‍या एका 35 वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र कन्ना याने फिर्यादीच्या आईस नातेवाईकांनी करणी केली आहे, असे सांगून त्यांच्या आईला बरे करण्यासाठी कागदी चिठ्ठ्या तयार करुन, काळी बाहुली, लिंबू, हळद, कुंकु, लिक्वीड याचा वापर करुन होमहवन केले. तसेच स्मशानभूमीत बोकडाचा बळी देणे, यासारखे जादुटोणासारखे अघोरी कृत्य केले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून वेळोवेळी 50 लाख 30 हजार रुपये घेतले. मात्र, त्याचा काहीही फायदा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यावर मनिष शिंदे याने राजेंद्र कन्ना याच्याकडून पैसे घेऊन देतो, असे आमिष दाखविले. त्यांच्यासोबत वेळोवेळी अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केला. त्यांनी हा प्रकार कोणाला न सांगण्याची व तक्रार न करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी इतके दिवस तक्रार दिली नव्हती. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट तपास करीत आहेत.

get_footer();