आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराची एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबद्धता

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 21, 2021

फरासखाना पोलीस स्टेशनची कारवाई : मागील पाच वर्षांत सहा गुन्हे दाखल

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. मागील पाच वर्षांत त्याच्यावर गुन्हेगारी कृत्यांचे एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.

फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा गुन्हेगार प्रतीक पृथ्वीराज कांबळे ( वय २९, रा. मंगळवार पेठ, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह फरासखाना पोलीस ठाणे, पुणे हद्दीमध्ये गावठी कट्टा, कोयता, लोखंडी सळई, सुरा, लाकडी दांडके यांसारख्या जीवघेण्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत, दुखापत, दरोड्याचा प्रयत्न, दंगा, सरकारी नोकरावर हल्ला करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये त्याचेविरूद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमास स्थानबद्ध करण्याकामी प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करून नमुद इसमाचे विरुद्ध एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरिता स्थानबद्धचे आदेश पारीत केले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये ४४ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्ध केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे.

get_footer();