आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पप्पू येनपुरे गँगचे तिघे जेरबंद, मोक्का कायद्यांतर्गत पोलिसांची कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 21, 2021

महाराष्ट्र ३६० न्यूज

कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून लुबालडे तसेच परिसरात घातक हत्याराच्या साहाय्याने दहशत पसरविणाऱ्या पप्पू येनपुरे गँगमधील तिघांना जेरबंद करून मोक्कांतर्गत पोलिसांनी कारवाई केली.

टोळीचा म्होरक्या प्रवीण ऊर्फ पप्पू अनंता येनपुरे (वय २७) त्याचे साथीदार अजित अंकुश धनावडे (वय २४) अभिजित नंदू बोराटे (वय ३१, सर्व रा. अटल चाळ, सचाईमाता आंबेगाव खुर्द, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी निखिल पप्पू गायकवाड (रा. सच्चाईमाता, आंबेगाव खुर्द) याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, पप्पू येनपुरे टोळीमधील अटक आरोपींवर २०१६ पासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या पप्पू येनपुरे प्रत्येकवेळी वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने दहशत पसरवित होता. दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र, दहशत माजविणे अशा स्वरूपाचे गुन्हे असून, त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली. हद्दपारीची ठोस कारवाई करूनदेखील त्यांच्यामध्ये बदल झाला नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी ठोस कारवाई करण्याचे पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार पप्पू येनपुरे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सागरपाटील यांच्यामार्फत प्रस्ताव सादर केला. त्यानंतर अपर पोलीस आयुक्तांनी प्रवीण ऊर्फ पप्पू येनपुरे याच्या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणिक, आशिष कवठेकर, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, कृष्णा बढे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, अमित शेंडगे यांनी मोक्का प्रस्ताव सादर केला होता.

get_footer();